Wednesday 1 October 2014

Interview by Jaya Rao

Following is the transcript of an interview conducted by Jaya Rao with me. The podcast uploaded by her can be heard in   http://tanjavurmarathi.podomatic.com/entry/2014-09-29T12_18_37-07_00.

जया : धन्यवाद तुम्हाला, श्री आनंद राव वसिष्ठा, "मझ॑ अस्तित्व"च॑ आजच॑ भागांत वेळ काढींग्यून या करतां. आजच॑ इंटरव्ह्यूच लक्ष्य येऊन॑, तुम्च॑ प्रयत्न in the conception and development of "तंजावूर मराठी शब्दकोश". साई श्रीधर जनार्धन "मझ॑ अस्तित्व"च एक भगांत शब्धकोश प्रकल्पाबद्दल सांगीट्लोते. झाल तरीं, मला तुम्च तोंडांतसून ऐकामते आहे कां म्हणजे, हे तुम्च brainchild आहे.  मझ॑ पहिल प्रश्न येवुन, कां अणि कस॑ तुम्हि हे प्रकल्प आरंभ केलांत॑ अणी तुम्हि कस॑ घेट्लांत पहिल॑ पाऊल हे प्रकल्पाला अकार द्या करतां?

ARV : "मझ॑ अस्तित्व" कार्यक्रमांत मला स्वागत केलत्याला उजंड thanks. That is the first thing I need to tell you. उजंड thanks again.
तुमच प्रश्नाला उत्तर द्याच पुढे मला एक सांगामते आहे. साई श्रीधर जनार्धन हेंच Lexicon Project अणी मझ॑ Dictionary Project, हे दोनीं वेगळ॑-वेगळ॑ आहे. त्यंच Lexicon Project तेनी चार-पांच महिनेच पुढे आरंभ केले अणी तज उद्देश तंजावूर मराठीच एक Lexicon तय्यार करणे हे आहे, अस॑ वाटते मला. तेनी हेज विषीं मझकडे मात्र नहो, पण MDMSच तीन-चार वेगळ॑ लोकां बरोर पणीं संपर्कांत आहेते. त्यंच हे Project कसल॑ / काय रूपाच असेल॑, हे इथपरच निश्चय करामते आहे म्हणून साई श्रीधर जनार्धन मला ते वेळी सांगिट्ल॑ होते. मझ॑कडून मी त्यंच प्रोजक्टाला एक "structure" कळिवलोंहें. हे विना त्यंच idea अणी त्यंच वेग-वेगळ॑ MDMS Committee Members यांच अभिप्राय हे सग्ळीन त्यंच कम्मिटींत चर्चा करून पुढे जातील.

मझ॑ डिक्ष्णरी मी 2009 जनुवरींत॑ आरंभ केलों अणी तेच वर्षी एप्रिलांत॑ मझ॑ ब्ळोगांत॑ अप्लोड कराला आरंभ केलों. मझ॑ हे डिक्ष्णरी, मझ॑ "दक्षिणी मराठी पुनरुद्धारिणी" प्रोजक्टाच (DMP Project) एक भाग आहे. हे प्रोजक्टांत॑ डिक्ष्णरी विना अण्खीन वेग-वेगळ॑ विभाग असेल॑. What I mean is DMP has got a bigger agenda than only to have a dictionary.

अत्ता तुमच प्रश्नाला उत्तर देतों. मी कस॑, कां हे आरंभ केलों म्हणून. मी 2008-आंत॑ रिटैर झालों, बॅन्कांतून॑, अणी सात-आठ महिना उगे बसलोतों. वय होतां-होतां अम्च॑ बुद्धी मंद होत जाईल म्हणून अग्गिदनालीं कळेलच. वयेपणांत॑ एक नव॑ भाषा शिकलतर॑ बुद्धीला चोक्कोट म्हणून कोठकी वाचलों. एक नव॑ भाषाला कोठ हुडिकींगून जाणे ? कोणाला विचारणे ? अस॑ योचना करत असताना मला वाटल॑, कां अमचेच तंजावूर भाषा शिकताने म्हणून. हे पणीं थोर प्रश्नेच. कां म्हण्जे, तंजावूर मराठी विषीं तुम्हाला कोठीन काहीं मिळना. अम्च॑ भाषा शिकाच पुढे तला एक नव॑ दिशा, म्हणजे, पुनरुद्धार करलतरेच पुढच॑ काम होईल अस॑ मला वाटल॑. हे उद्देशांत मी मझ॑ "दक्षिणी मराठी पुनरुद्धारिणी" प्रोजक्ट आरंभ केलों. 2009 जनुवरींत॑ आरंभ केलों. अणी मझ॑ ब्ळोगांत॑ 2009 एप्रिलांत॑ अप्लोड कलारा आरंभ केलों. मझ॑ ब्ळोगाच नाव आहे vishnughar.blogspot.com. हेजांत तुम्हाला विशद होऊन मझ॑ DMP प्रोजक्टाच विषीं विवर॑ मिळेल॑.

जया : कस॑ वाटते, एवढ॑ वर्ष होऊन गेल॑, हे प्रोजक्ट आरंभ करून. कस॑ वाटते तुम्हाला अत्ता ?

ARV : मी सांगट्लों की, actually, basically it is personally a "health process" for me. I should keep my brain active. हे एक "open-ended project" आहे. समयांत संपणार नाही. नव॑ नव॑ ideas मला येताना हेज बरोर जोडून जाईल॑ ते. ते मला बर॑ वाटते. दिवसोडी सात आठ घंटे मी हेज व॑र बसतों, कंप्यूटरांत. एक एक दपा प्रोजक्ट re-visit करताना काही तरीन corrections, additions modifications करतच असतों. खर॑ सांगट्लतर॑, मला वेगळ॑ वेळेच मिळत नाही. अणी मझ॑ wifeला पणीं ते अवडत नाही. But why she is happy is because त्यंच टी.वी प्रोग्रामाला मी interfere करेत नाही. टीवीला भांडा-भांडी होत नाही ! मला मझ॑ कंप्यूटर झाल॑, त्यांस॑ त्यंच टी.वी. झाल॑. So it maintains peace in the house !

जया : तुम्ही यात्रा आरंभ करतां वेळी काय काय अडचण मध्य आल॑ ? काय काय तुम्हाला अडचण face करामते पडले ?
   
ARV : अडचण म्हणजे.....काय ? Biggest challenges and accomplishments ?

जया : होय. कां म्हणजे, तुम्ही Indiaंत रिसेर्च करताहेंत. ते करतां तेवढ दनालीं कळेल, केवढ॑ challenging job म्हणून. Data मिळना, Governmentंत्सून co-operation मिळना. तज व॑रच परिस्थिती सांगांत॑.

ARV : What you are saying is absolutely right. पहिले challenges काय काय होते म्हणून सांगतों. पुढे सांगट्ल॑ त्यास्क॑ तंजावूर मराठी विषीं तुम्हाला कोठीन काहीं मिळना. हेच तेवढ्यां पक्षा मोट्ठ॑ अडचण म्हणून मला वाटते. इंटरनेटांत॑ भरून हुडुकून पाह्यलों. काहीं मिळ्ळ नाही. एकवीसां शतकांत॑ अम्ही बोलाच तंजावूर मराठी विषीं तुम्हाला कोठीन काहीं मिळना. महाराष्ट्रांत॑, प्रत्येकशी पुणे Universityच॑ मराठी विभागाला संपर्क केलों. तिकडल॑ Prof. Punde यांस॑ contact केलों. हेनी Pune Universityच॑ Marathi विभागाच॑ Head of the Dept होते. काहीं झाल नाही. तेनी मला Dr. कल्यान काळे यांस॑ विचाराला सांगिट्ले. हेनी पणीं ex-head (अध्यक्ष) होते, मराठी डिपार्टमेन्टाच॑. हेंचकडून पणीं काय विवरीं मिळ्ळ॑ नाही. तसच महाराष्ट्र सर्कारांच "राज्य मराठी विकास संस्था" इकडल॑ Director श्री. Girish Patke यांस पणीं संपर्क केलों. काहीं प्रयोजन झाल नाही. तंजावूर मराठी विषीं महाराष्ट्रांतून काहीनच मिळ्ळ॑ नाही. असलते परिस्तितींत॑ कस॑ पुढे जाणे ? हेच मला थोर प्रश्न अणी विचार होत॑. ते वेळी निश्चय केलों, मझ॑ काम होम म्हण्जे मी स्वता काय तरीन करल॑ तरेच होईल म्हणून. Self help is the best help म्हणून सांगतातकी तसेच. अम्च मराठीच एक डिक्ष्णरी लिव्हलतर॑ काय, अस॑ वाटल॑ मला. अत्ता साई श्रीधर जनार्धन आरंभ केलतेस्क एक vocabulary  आरंभ केलों. 2009 जनुवरींत॑ होत॑ हे. ते वेळी इनटरनेटांतेकी, फेस-बुकांतकी  तंजावूर मराठी लोकांच समूह कोण्तीन होत नाही. म्हणजे, अम्च॑ मराठी बोलणार वेगळे लोकांचकडून पणीं काय सहाय्यीं मिळनाते अवस्था. अम्च॑ समुदायाच पहिल-पहिलच online group, म्हणजे, रवी शेलवनकर यांच फेसबुकांतल॑ TMG Group, 2009 सेप्टंबरांत॑ आरंभ झाल॑. म्हणजे, मझ॑ प्रोजक्ट आरंभ होऊन सुमार सहा महिनेच नंतर॑. हे परिस्थितींत॑ मीच बसून, एक-हदार दीड-हदार गोष्ट कागदांत लिव्हून मझ॑ प्रोजक्ट आरंभ केलों. I can not actually call it a painstaking work. But it is work of passion म्हणून सांगूया. ब्ळोगांत॑ अप्लोड करताना अस॑ वाटल॑, कां एक-एक गोष्टीं वाक्यांत॑ प्रयोग करून दाखिवताने म्हणून. अस॑ केल तर॑, दोन कार्य होईल. डिक्ष्णरीला डिक्ष्णरीईं होईल, तसच अम्च॑ भाषा कस॑ लिव्हणे हे दाखिवाचीं होईल. Two birds in one stone म्हणून सांगतातकी तस॑. तज नंतर॑ DMP Project एक रूपांत॑ आलाव॑र South Indian Maharashtrian Association, (म्हणजे, SIMA Hyderabad), हेज ते वेळाच Vice-President, Shri. R.R. Chandran, हेनी मला फार सहाय्य केले. I am greatly indebted to him. He gave me a lot of words. He remembered words spoken by his Grandmother with whom he grew up as a kid. हे आठवण करून मला पाठिवून देले and functionally मी त्यंच बरोर ई-मेलांत॑ संपर्कांत होतों. फार चर्चा झाल॑ अणी he gave me a lot of help, but he refuses to take the credit for what he has done, despite the fact that I have given due acknowledgement in my work.

अणी तुम्च॑ प्रश्नाच दुसर॑ भाग होत॑, what were your accomplishments ?. हे प्रश्नाला मीच उत्तर देल तर॑ बरोर असना.

जया : झाल तर॑ तुम्च॑ विना कोणीनच नाही हे प्रोजेक्टांत॑ involved. तुम्ही एकलेच आहेंत. तुम्च तोंडांतूनच तुम्च प्रश्न ऐकामते पडेल अम्हाला. So that is interest in me.

ARV :  I understand. मझ॑ हे प्रोजक्ट is an One-man show म्हणून सांगूया. But I am not really happy about that. In fact I want this to be a "multi-man" show. To that extent साई श्रीधराच efforts I really appreciate अणी तेनी मला एक दपा सांगट्ल होते, अम्च॑ प्रोजक्ट दोनीं merge कराला होईलका म्हणून. ते merge करून मी एक structure करून पाठिवलों. Then I told him to kindly continue his project because the target groups were slightly different. मे हेज विषीं नंतर सांगतों.

अत्ता तुम्ही काय विचारलांत॑, accomplishments म्हणून. म्हणजे, मी म्हणट्लों I cannot say about my accomplishments. तरीन, मी सांगतों. "दक्षिणी मराठी पुनरुद्धारिणि" प्रोजक्ट आरंभ कराच पुढे कोणीं असलते काम केल होते नाही. Mine is the first ever attempt to record our language as spoken in the 21st  Centuary. It is the first ever attempt to prepare a dictionary of Tanjore Marathi as spoken in the 21st Century. हे गोष्ट फार गौरवाच आहे, अस॑ वाटत॑ मला. But frankly, I want more and more people of our community to get involved in issues relating to our language. Only then will I feel satisfied.

अण्खी एक सांगतों. मझ॑ ब्ळोग पाव्हून Jawaharlal Nehru Universityच॑ एक Research Scholar, सौ. मानसी केळकर मला ई-मेलांत॑ contact केले अणी सांगिट्ले, and I quote;- "This is Manasi Kelkar, currently working on my Ph.D proposal ie, "Descriptive grammar of Thanjavur Marathi". I am following your Blogs since two years and those are the major inspirations for me to take up this project.....I would like to take your permission to make use of your dictionary as a reference". Unquote. अत्ता मानसी केळकराला मझ॑ DMP प्रोजक्ट पाव्हून अम्च॑ मराठीचव॑र एक research कराम॑, अस॑ वाटलते ऐकून मला मझ॑ प्रयत्न सार्थक झाल॑ म्हणून वाटते.

अण्खीन एक झाल॑. तसच, Prof. Dr. S. N. Sridhar, Distinguished Service Professor and Professor of Linguistics and India Studies at the State University of New York in Stony Brook,  हेनी अणी हेंच॑ colleague & पत्नी Prof. Kamal K. Sridhar हेनी दोघीं 2011आंत॑ मला भेटाला मझ॑ घराला आले अणी दोन-तीन घंटेच recorded interview केले. Dr. Kamal Sridhar is currently an Associate Professor in the Department of Asian and Asian American Studies and Linguistics. हेंच मातृभाषा तंजावूर मराठी आहे. हेनी अत्ता "Language Maintenance Among the Thanjavur Marathi Speakers" हे विषयाच व॑र एक पुस्तक लिव्हेत आहेत॑. मझ॑ ब्ळोग पाव्हून मला भेटाला आले, हे ऐकून मला फार गौरव वाटल॑. तंजावूर मराठीला पुनर्रुद्धार कराला त्यंचकडून काय सहाय्य पह्जे तरीन कराला तय्यार आहों, अस॑ जाताना सांगून गेले.

जया : कसाला अम्ही "दक्षिणी मराठी" म्हणूनटाकून सांगाम॑ ? कां अम्ही "तंजावूर मराठी" म्हणूनटाकून सांगताने ? तुम्ही नव॑ होऊन re-define केलाहेंत, "दक्षिणी" / "देशस्थ" मराठी म्हणून. त्या वरती काईं सांगांत॑.

ARV :  सांगतों. There is some historical background that everybody knows. अम्च॑ पूर्वज तंजावूर संस्थान स्वाधीन करून ते ठिकाणेच अम्च॑ देश म्हणून तिकडेच राहले-ते-करतां अम्च॑ भाषाला तंजावूर मराठी म्हणून नाव आल॑. पण, अत्ता तंजावूर प्रांतांत॑ अम्च लोक॑ जास्ति नाहीते. भरून दन॑ बाहरच गांवांत॑ स्थिर होऊन राहतात॑. तंजावूरांत॑ अम्च॑ लोकांच दीडशे/दोनशे कुटुंब पणीं आहेका म्हणून मला संशयेच. अत्ता चेन्नैत॑ तंजावूरापक्षा जास्ति लोक आहेत॑. भारताच वेग-वेगळ॑ प्रदेशांत॑, परदेशांत पणीं अम्च लोक आहेत. तिकड-तिकड उजून वाढलते नव॑ पिढीच अम्च॑ लोकांस॑ "तंजावूर" म्हणजे कित्ती अभिमानीं प्रीतीईं वाटेल॑, हे विचारूनच कळाम॑, नाही का ? हेज बद्दिल अम्हाला नुस्त "दक्षिणाच मराठी लोक॑" अस॑ म्हणट्लतर॑ अण्खीन थोड उचित होईल म्हणून मला वाटते. अणी दक्षिणाच मराठी लोक॑ म्हणून सांगट्ले की, अम्च॑ भाषा "दक्षिणी मराठी" म्हणून सांगणेंत॑ चूक काहीं नाही. Basically I feel that I am not a Maharashtrian. But my mother tongue is मराठी. I am a South Indian and that is our identity. We are South Indians. अम्ही merge झाल॑ तर॑, अम्च॑ identity will be lost. So, we are South Indians and the mother tongue is मराठी. Definitely it is मराठी ; it is a dialect of मराठी. May be अपभ्रष्ट झालाहे. But, nevertheless, it is मराठी.

जया : ते unique identity अम्ही maintain कराम॑.

ARV :  होय॑, होय॑. अत्ता अण्खीन एक. अम्च॑ भाषाला उद्धार कराच उद्देश, म्हणजे, नव॑ पिढींच लोकां करतां आहे अम्ही हे कराच, नाही का ? पुनरुद्धार केलते भाषेला एक नव॑ नाव देणे भविष्यांत॑ अम्च॑ लेंकर॑-बाळांस॑ बर॑ वाटेल, अस॑ मला वाटते. हे reasons पाह्ताना "दक्षिणी मराठी" अस॑ सांगणे उचित आहे म्हणून वाटते.

जया : होय॑. Especially अम्च॑ communityंत॑ उजून वाढतातकी metropolitan citiesआंत॑ like Bombay, Delhi and even places like Jharkhand. तुम्ही सांगट्ल होतांतकी, भोजपूरीस्क॑ तंजावूर मराठी बोलणार पणीं आहेत म्हणून.

ARV :  होय॑. ऐकाला फार विचित्र होत॑ ते ! पण, फार स्पष्ट पणीं होत॑. That was the beauty of it. मी सांगट्लोंकी, the Professor from the University of New York, Dr. (Mrs) कमल श्रीधर, त्यंच बरोर त्यंच भाऊ पणीं आल॑ होते, मला भेटाला. म्हणजे, वाट दाखिवाला म्ह्णून आल॑ होते. अणी, तेनी म्हणट्ले, तेनी बीहारच॑ आहेत म्हणून. तेनी उजून वाढलते पूरा बीहारंतच॑. अणी शिक्षण वगैरा वगैरा तिकडेच झाले. अणी तेनी मझ॑कडे तंजावूर मराठींतच बोलले. मला फार विचित्र ऐकल॑. अम्चेच भाषा होत॑ ते. संशयच नाही. अम्चेच syntax. पण भोजपूरी intonations होत॑ त्यंच॑.

जया : मला तरीन योचना पणीं करून पाह्याला होत नाही !

ARV :  It was really amazing ! I couldn't believe that people from Bihar also speak our language. Just imagine this. He has no other connection with Marathi. म्हणजे, मराठी म्हणजे अम्च॑ मराठीच॑ त्यंच॑.

जया : होय. होय॑. तिकडे राह्यलते करतां तिकडलच॑ dominant भाषाच॑ impact होईल॑. Influence होईल॑.

ARV :  अत्ता लालू प्रसादाच॑ हिंदी ऐकतों की अम्ही, तस॑ होत॑ ते ऐकाला. I don't mean it in a demeaning way. I mean it in an amusing way.

जया : तेवढ॑ लोकांसीं एक different and distinct accent आहे. एक dialect आहे.

ARV :  होय॑. For example, though I speak तंजावूर मराठी at home ie, दक्षिणी मराठी at home, मझ॑ पूर्वज तंजावूरांतून ट्रावनकोर संस्थानाला nearly about 200 years पुढेच migrate केले. They were under the employment of Travancore kingdom. मझ॑ आजाच आजा तिकडल॑ दिवाण होते. दिवाण रामराव म्हणून. ते वेळ पसून अम्च॑ family is there. अत्ता of course, कोणीं नाही तिकडे. मझ॑ cousin एकले आहेत. अणी, त्यंच काळाच नंतर॑ तिकड॑ कोणीं असना. मी, वराड अग्गीन करून बॅनग्ळोरला shift केलों. मद्रासांत॑ वाचलों. My son and daughter, both are married and they can not speak the local language, Malayalam वगैरा, वगैरा. मला येत॑ मलयाळम बोलाला. मे हे कां म्हणतों म्हणजे, तुम्ही "accent" म्हणट्लांत॑. अत्ता मला कळेल, मझ॑ इंग्ळीष अणी मराठींत॑ मलयाळमाच एक accent येऊन शकते. सहजेच ते. It is as simple as our friend Dr. Kamal Shreedhar's brother talking "भोजपूरी तंजावूर मराठी".

जया : होय॑. ते subconsciously merge होऊनजात॑ अम्च॑ geneंत॑. So, अम्ही काईं कराला होयना. It is part of us and we have to be proud of it.

ARV :  It is natural. Language is a medium of communication. That is as simple as that, नाही का ?

जया : महाराश्ट्राच मराठी अणि अम्च मराठी (अम्च॑ भाषाच) व्याकरणां मध्ये काय फ़रक आहे ?

ARV :  All of us know there is difference. अम्च॑ भाषाच शब्दकोश तय्यार करताना मला एक उद्देश होत॑. अम्च॑ गोष्ट॑ एक वाक्यांत॑ प्रयोग करून दाखिवणे. That was the main thing actually. That was the main purpose I started this so called "Dictionary Project". डिक्ष्णरींत॑ नुस्त एक गोष्ट देऊन तज अर्थ देलतर॑ it becomes, what shall I say.....very uninteresting for a linguist to go through. पण, वाक्यांत लिव्हताना अम्च॑ syntax अणी grammar प्रत्यक्ष होईल॑. So, महाराष्टाच मराठी व्याकरण॑ अणी तंजावूर मराठी व्याकरण॑ हे दोनां मध्ये भरून वेत्यास आहे. गेल॑ दोन-तीन शतकाच कालावधींत॑ अम्ही बोलाच रीतींत॑ उजंड परिवर्तन आलाहे. म्हणजे, तंजावूर मराठी अम्ही अत्ता कस॑ बोलतों की (21st सेनचुरींत॑ कस॑ बोलतोंकी) it was not the same way it was being spoken may be about 150/200 years back. Any language undergoes modifications over a period of time. तस॑, अम्च॑ भाषाला पणीं झालाहे. कस॑ तंजावूर मराठीच grammar अणी syntax अणी पुणे मराठीच syntax and grammar, कोठ॑ ते divergence आरंभ झाल॑ म्हणून कोणीं रिसेर्च केले नाहीते. It is not difficult actually. तंजावूरच॑ सरस्वती महाल लैब्ररी तिकड जावून दीड दोन वर्ष बसून, मुक्काम बडिवून, तिकडल॑ पुस्तक काढून वाचून पाव्हून ते रिसेर्च केलतर॑, होईल॑. It can be found out. So, obviously ते फरक आलाहे. मी काय म्हणतों, basically मी सांगतों, अम्च॑ syntax अणी grammar हेजेच main वेत्यास॑.......मी पुन्हाईं कस॑ सांगू अत्ता ?

जया : उदाहरण द्यांत॑. ल्हान.

ARV : एक भाषाच व्याकरण॑ तज "सिंटाक्साच" आधारांत असत॑. That is the main thing. Grammar is  actualy a derivative of the spoken language. Spoken language म्हणजे syntax. अणी syntax लोक्कुर बदलते, particularly in our case. तमिलाच influence अणी South Indian languageच॑ influence हे फार आलेव॑र अम्च syntax and pronunciations फार वेत्यास झालाहे. अणी on that basis अम्च॑ grammar अणी पुणे मराठीच grammar वेत्यास झालाहे. I think that is a very very interesting research area for real scholars of languages.

जया : होय॑. Linguistics लोकां करतां हे .......

ARV : And it is possible. In fact, तिकडून मला one or two people did contact me. अत्ता तुम्चकडे बोलताना I think it is another topic. May be we can talk later on, on that particular topic. पण, मी एक hint देतों. तिकडल॑ लोके contact केले हेज विषीन काय कराच म्हणून. मी सांगट्लों. AD 1675/1680 मध्ये अम्च॑ लोक॑ तंजावूर संस्थान स्वाधीन केले अणी ते वेळी मराठी एकच होत॑. पुणे मराठी अणी अम्च॑ मराठी हे दोनी एकच होत॑. It is only a natural inference.

जया : अम्च॑ मराठी भाषा म्हणूनटाकून वेगळ॑ होत नाही का, दोनशे तीनशे वर्ष पुढे ?

ARV :  It has to be the same, no ? In 1675, when the Tanjore kingdom was conquered by Venkoji, obviously the language was the same. तज नंतर॑ हे divergence आरंभ झाल॑. अत्ता, तिकडलच॑ सरस्वती महाल लैब्ररींत॑ I think about 3 to 4000 मराठी documents are available for research. ते bundle करून ठिवलाहेत॑. Mostly मोडींत॑ लिव्हलाहेत॑. तेलुगु script पणीं use केलाहेत॑ तेनी तिकडे. And, of course देवनागरी पण आहे, but actually, previously the fashion was to write in मोडी script. And what sort of documents are they ? Many of the documents relate to the Royal grants given to local people, local कायकी Court decisions, अणी local issues, अणी कोणाला कायकी दान देलते, देऊळाच काय तरीन. अस॑ things are recorded over a period of time. This obviously is in local तंजावूर मराठी language. Over a period of time you can follow the details. म्हणजे, detailed research केलतर॑ you will find out how the language would have changed. Those sets of documents need to be studied for the purpose of research and not the other set of मराठी documents which are available in the Tanjavur Library. कां म्हणजे, the other मराठी books (classical books) basically would have been in pure मराठी. Also, तिकडल॑ महाराष्टाच पुस्तक, तिकडून हुडुकून शोधून काढून इकड॑ लैब्ररीच आंत आणून ठिवल अस्तील॑. There is no point in looking at those things. हे Royal Edicts and Government decisions and High Court decisions and then local issues, देऊळाच काईं functions, ते वाचल तर॑, over a period of time you will be able to find out the difference. It will be Herculean task. This has to be done by somebody. In fact, it is a gold mine for a new scholar to find why the languages became different. आम्ही सुलूभांत॑ सांगतों तमिलाच influence ह्यांत आल॑ म्हणून.

जया : होय॑. अणी एक दुसर॑ अस॑ अहे की, अम्ही isolate होऊनगेलों उजंड वर्षांत्सून.

ARV : That is a fact. Nearly 1500 / 2000 km दूर अहों, तंजावूर अणी महाराष्ट्रा.

जया : नुस्त isolateच नाही, झालतर॑ अम्ही local cultureआंत॑ assimilateईं होऊनगेलोतों. So we adopted the local culture.

ARV : I will tell you something interesting about this. अत्ता, तंजावूराच महाराजा वेंकोजी होते. The second महाराजा (त्यंच नाम मला सये येत नाही), his wife's name was राजम्मा. Now, is it not amazing, नाही का, that the second Maharaja's wife's name is राजम्मा ?

जया : तमिल, अरव॑ नाव॑ !

ARV :  Exactly ! अरव॑ नाव॑ ! Is it not amazing ? And she was not a Tamilian. She was a Maharashtrian. हेज अर्थ काय ? म्हणजे, अम्च॑ लोके, they decided, yeah, now this is our land, this is where we belong, we have travelled long and we need to adopt the local cultures. There is no point in going back to Maharashtra, म्हणून तेनी decide केले अणी तेनी राह्यले अणी तिकडेच वागाला शुरू केले अणी तिकडच साळे वगैरा...... तिकड॑ मराठी schools जास्ती होत नाही ते वेळी and तमिल was the medium of instruction and they studied तमिल. And that's about that. It is just like American English is different from the British English. Americans decided, "yeah, this is our language" ! Their words are different. Very very innovative words they have and they said, "this language is different. This is American English" ! तस॑ अम्च तंजावूर मराठी, ते वेगळच॑. It is a different thing and we have to live with that. The only question is अम्ही ते लिव्हाच अणी वाचाच॑, ते अम्ही सोडूनटाकलों. तजकरतां अपभ्रंश जास्ती लोक्कुर झालाहे.

जया : तजांत्सून, अम्च॑ vocabularyच॑ नही.......काल मी बसलों "मझ॑ अस्तित्वाच" एक episode record करा करतां अणी मला "celeberate"च तंजावूर मराठी शब्द पह्जे ते होत॑. Standard मराठींत॑ "साजिरा" म्हणतों, पण, अम्च॑ मराठींत॑ अम्ही कस॑ म्हणतो ? सण "celebrate" करांव॑ / करणे......ते अम्च॑ भाषांत॑ मला शब्द मिळत होत नाही. केवढ॑की अस॑ शब्द आहेकी, मी इंग्ळीषांतच बोलतें, नाहीतर मराठी वापरतें. अम्हाला actually कळना, तसल॑ शब्दाला अम्च॑ भाषांत॑ कस॑ express कराम॑ म्हणूनटाकून. So that is another challenge. हे एवढ॑ वर्ष मी एकीन face करलते नाही, rather मी पाह्यलते नाही, पण अता मी बसतें "मझ॑ अस्तित्व" episode रेकोर्ड करा करतां. Sudden realisation होत॑, अम्च॑ भाषांत॑ एवढ॑ mixture होऊन गेलाहे, वेगवेगळ॑ भाषाच॑. एवढ॑ dominance होऊन गेलाहे की, अम्च॑ भाषाच original, हेच नूंगेलाहे. So we lost a lot of vocabulary over a period of time.      

ARV :  You are partly right. "Partly" म्हणून कां सांगतों मी. अत्ता पुणे मराठींत पणीं तुम्ही पाह्तांत॑. आत्ता I will just compare पुणे मराठी and our मराठी. अम्च॑ भाषा बोलताना अम्हाला एक particular गोष्टाला अम्हाला एक word मिळत नाही म्हणून ठींगा. I have done some check back with पुणे मराठी dictionary. Believe me, in 70% of the time even they don't have a word !

जया : होय॑. त्यंच पणीं एक उर्दू influence ......

ARV :  Exactly ! . त्यंच actually, that particular word which we don't have, their word, when you check up, is actually a Hindustani word. उर्दू असूया, पेरष्यन असूया, हिंदी असूया, पण हिंदुस्थानी म्हणतों अम्ही. म्हणजे, त्यांस॑ पणीं ते word होत नाही. तेनी, they had to.....they were forced to adopt those words because, तेनी मुघळांच स्वाधीनाच आंत होते. मुघळांच Court language Persian होत॑ and the bazar language (market language) was Hindustani. आणी, they had to interact with those officials and get along with them. तसल॑ words मराठींत॑ घूंसल॑. Exactly the same situation in our case also for those words which were not there. Because, what happens is, as language develops, society also forces new words into the language. अत्ता हेच उदाहरण काढाम॑ म्हणजे, the 21st century says "computer" is there. See, 200 years back, कंप्यूटर होत नाही. अत्ता what word are we to use for "computer" ? अम्ही "कंप्यूटर" म्हणूनच सांगतों. That is how new words are thrust into a language. Just imagine 300 years back. What was the social activity ? म्हणजे, काय होत॑ ते वेळी ? Economic activities म्हणजे काय होत॑ ? नुस्त I think some textile industries were there and iron-smithy, लोहेंच काम for making instruments meant for war, those sort of things. There was no Industrial Revolution. हे इंद्याला पणीं आल होत॑ नाही ते वेळी. So as society developed the new activities forced the entry of new words into the language.

जया : होय॑.

ARV : Let us say, अत्ता मी, I am stating in Bangalore. I am staying in Banashankari 3rd Stage, (Girinagar). "3rd Stage" म्हणाम॑ म्हणजे we have to discover a new word. अत्ता कन्नडांत॑ "बडावणे" म्हणून सांगतात तला. It is a new word which Kannada had to fabricate. This is how languages grow.

जया : होय॑. Even ब्रिटनातीं every year डिक्ष्णरींत॑ words include करतात.

ARV : The question is, when English can take in so many words from different languages, अम्ही अम्च॑ भाषांत॑ वेगळ॑-वेगळ॑ भाषाच words काढल॑ तर॑, त्यांत चूक काईं नाही. Now, who is right and who is wrong ? अत्ता पुणे मराठीण्त॑ एवढ॑ हिंदुस्थानी words आलाहे, अम्च॑ भाषांत॑ तमिल words आलाहे. When we try to talk without Tamil words अम्ही English words use करतों. Who is right ? The question is, somewhere at some point of time, अम्ही ते structure कराम॑. Structure करल॑ तर॑ स्पष्ट होऊन, व्यक्त होऊन अम्हाला कळेल॑ अम्ही अस॑ गेल तर॑ कित्येक words अपभ्रंश होईल॑, syntax अपभ्रंश होईल॑. अस॑ अस्ताना, we have to put it in black and white and arrest such trends. That was my aim. पुनरुद्धारण म्हणून word use केलों मी, म्हणजे, "restoration" तज meaning. अत्ता restoration कस॑ करूया ? तुम्ही म्हणट्लांत॑ दोन दिवसाच पुढे तुम्ही ते "पोड्कास्टाच" प्रयत्न करताना तुम्हाला गोष्ट जास्ती मिळ्ल॑ नाही म्हणून. You were forced to use some words of पुणे मराठी. मी पणीं तंजावूर मराठींत॑ (दक्षिणि मराठींत॑) लिव्हताना, कित्येक words (अम्ही normally वापरनाते words) were deliberately used. मझ॑ डिक्षणरींत॑ पणीं मी तस॑ use केलोहें. I have a very clear idea as to why I am using such words. अम्च॑ भाषा पुरुद्धारण कराम॑ म्हणून अम्हाला आग्रह असल॑ तर॑, असलते गोष्ट वापरूनच सराम॑. Like how you were forced to use some words of पुणे मराठी, similarly when we start writing in our language दक्षिणी मराठी, we will be forced to use words which we have not been using on a daily basis. अस॑ करल॑ तरेच अम्च॑ भाषा पुनरुद्धार होईल॑, अणी ते अपभ्रंश होयाच stop कराला (राह्ते कराला) होईल॑. This is how it has to be done.
Unfortunately, अम्च॑ हे on-line Social Groups अग्गीन आहे की, त्यांत॑ all of us say that अम्च॑ भाषा अस॑ झालहे म्हणून. अस॑ सांगणांत॑ उणे काईं नाही. पण, अम्ही कस॑ ते उद्धारण करणे ? पुनरुद्धारण कस॑ करणे ? अम्ही ते कस॑ शिकणे ? तला कोणीं एक पहिलेच step, पाऊली, कोणीं काढाच॑ मी पाह्यलों नाही.    
   
जया : Seriously हे घेऊन होम॑ as a community अणी अत्ता technology एवढ॑ वाढून गेलाहे की, we have to take the best use of technology.

ARV : होय॑. हे कराला होईल॑. मी अत्ता चार पांच वर्षापसून रिसर्च केरेत बसलोंहें and I am absolutely convinced, it is doable. It is possible.

जया : तेच मी सांगतें. अत्ता केरळांत॑ उजून वाढून, तुम्हाला देवनागरी लिपीच व॑र काहीनच relation होत नाही. हे वयेंत॑, तुम्ही शिकींगून हे अग्गीन करतांत॑. So anybody can do it.

ARV : अम्च॑ लोक॑ most of them are well educated, most of them are well positioned, thanks to God. अम्हाला वेगळ॑ problems काहीं नाही. अम्च॑ लेंकरे बरोर वाचलाहेत॑. In fact, our children are comfortable and familiar with देवनागरी. If we can not bequeath a perfect language, we can at least bequeath a desire for a better language. That is our responsibility.

जया : अत्ता आरंभ करल॑ तरीन next पन्नास वर्षांत॑ कायतरीन होईल. तोडक॑ तोडक॑ बदलाव तरीन होईल.

ARV : Something like that has to happen. There are communities, चेन्नैंत॑ MEF, अणी तसेच हैदेराबादांत॑ SIMA. तेनी भरून वर्षांत्सून अहेत॑. I think SIMA has been there for last 35 years. अणी, MEF in चेन्नै, शंभर वर्ष झाल॑ तेनी establish करून॑. From traditional way of handling those meeting ते सोडूनटाकून, on-line अत्ता अम्ही करतोंकी, तस॑ तेनी आरंभ करल॑ तर॑.......

ARV : अत्ता मला हे "दक्षिणी मराठी पुनरुद्धारिणी" प्रोजक्टाच डिक्ष्णरी मात्र नहो, एक "Teach Yourself Dakshini Marathi" अस॑ कराच एक idea पणीं आहे. It can not obviously be interactive, but on a teach yourself on a step-by-step basis. तसेच अण्खीन एक. मझ॑ डिक्ष्णरी मी देवनागरींत॑ लिव्हलोंहें, म्हणजे, मराठी words मराठी लिपी use करून तज English meaning देलोंहें अणी अम्च॑ भाषांत॑ तज meaning देलोंहें, अणी वाक्यांत प्रयोग केलोंहें. Most of our people do not know देवनागरी, मला कळेल ते.      

जया : होय॑. Especially कोण दक्षिणांत्सून येतात, ते लोकांना.

ARV : तमिलनाडांत॑ असणार लोकांस॑, it is difficult for them to understand. म्हणजे, वाचाला कष्ट होईल॑. म्हणून मी एक Phonetic Key develop करून मझ॑ ब्ळोगांत॑ घाट्लोंहें, "गूगल-ड्रैव" हेजांतीन घाट्लोंहें. हे पणीं साई-श्रीधराला मी पाठीवून देलोंहें. I have shared that Phonetic Key with him. I think I have shared it with you also.

जया : होय॑. मला पणीं पाठिवलाहेंत॑.

ARV : तुम्हाला पाठिवला नंतर॑ मी थोड minor modifications केलोंहें. Each word you see in a dictionary is called a "head-word". अत्ता सद्याला मझ॑ डिक्ष्णरींत॑ head-word देवनागरी लिपींत॑ आहे. हे डिक्ष्णरी पाह्णे अम्च॑ लोकांस॑ कष्ट वाटूया. देवनागरी alphabetical order अम्च॑ पोणावांटा लोकांसीं कळना, नाही का ? Even I had difficulty in the beginning. आरंभांत॑ मला पणीं मझ॑ डिक्ष्णरी देवनागरींत॑ (मराठी स्क्रिप्टांत॑) लिव्हणे फार कष्ट होत॑. It was a challenge actually. But I think I have now learnt how to go about that. I am pretty good at that now. अत्ता मी ते Phonetic Key प्रयोग करून लिव्हतों. That work I have started and may be in about three or four months you will find my dictionary with the head-words based on Phonetic Key. So, अम्च॑ लोकांस॑ वाचाला सुलूभ असेल॑. हुडकाला सुलूभ असेल॑. आत्ता "सुलूभ" हे गोष्ट हुडकाला they should search under "S". English dictionary पाह्याला अम्हाला कष्टच वाटना, कां म्हणजेम ते alphabetical order अम्हाला कळेल॑.

जया : अम्च॑ brain येऊन ते मादरी train झालाहे.

ARV : Wire झालाहे. It has been wired that way. This dictionary will almost be a replica of what I have done, but the search words will be written in English.

जया : तेच मी म्हणीगत होतें. इंग्ळीषांत॑ लिव्हल तर॑, it will be better म्हणूनटाकून. And we should also have English to Tanjore Marathi dictionary.

ARV : ते पणीं आहे. तज पणीं मी लिव्हलोंहें. But ते लिव्हाला आरंभ केलव॑र काय झाल॑, it was almost turning out like a thesaurus. It is coming out like that. It is more complex and complicated. DMP प्रोजक्टाला भरून मी सांगिट्लास्क॑ agenda आहे. दक्षिणी मराठी-English-दक्षिणी मराठी डिक्ष्णरी (DM-English-DM dictionary) हेजांत about four to five thousand words अप्लोड करणे झाल॑. I don't think many more words can get in. Use-in-sentences अण्खीन add करामते आहे. That work is going on. तज नंतर॑ "Teach Yourself Dakshini Marathi" प्रोजक्ट आरंभ करामते आहे. तज basic structure iron-out करून मझ॑ डोस्केंत आहे अत्ता, how that will look, how that will be structured and how it will pan out. हेज॑ framework is already in my head. But अत्ता ते कराला वेळ नाही मला, because I am awfully busy with these things.

जया : मझ॑ अण्खी एक प्रश्न आहे, आज नुस्त ते लोकांनांच कळेल, कोण फेस-बुकांत आहेत की. अत्ता केवढ॑ की लोक आहेत, तेनाला इनटरनेटच connection नाही. मी गेल वर्ष गेलोतें कुंभकोणम अणी तंजावूर. तिकड अग्गीन केवढ॑ की लोक, त्यंच घरांत इनटरनेटच connection नाही अणी तसच राह्तात॑. हेंच मद्ये तुम्च प्रकल्प प्रसिद्ध कराला काय दुसर॑ मार्ग आहे ?....off-line members ह्यां करतां ?

ARV : Very difficult thing actually. मी पुढे सांगट्लों की, अत्ता अम्च॑ physical, Brick & Mortar societies, other than on-line समूह........अत्ता on-line समूह आहे, रवी शेल्वण्कर हेंच॑.....

जया : ते recently च आरंभ होलाहे. ते वेळी हे पणीं होत नाही.

ARV : मी म्हणाच॑, Brick & Mortar societies आहे की, अत्ता SIMA म्हणून आहे हैदेराबादांत॑, तसेच MEF Chennai, असलते societies, they have to take a proactive role in that. Personally I felt happy because 2011न्त॑, South Indian Maharashtrian Association, Hyderabad, तेनी मला तिकड॑ बलावून एक मोट्ठ॑ प्रोग्रामांत॑ आदर केले. It was on the occasion of their 33rd Formation Day Celebrations. हे त्यंच संप्रदाय आहे. And it was a good evening with cultural programs. फार बेष होत॑ ते. Nearly 200 to 250 families of अम्च॑ दक्षिणी मराठी बोलणार लोक॑ हैदराबादांत॑ आहेत॑, अणी.....Governing Committee meets pretty often.

जया : So, अम्ही त्यनाला काईं सांगाला होईलका ?

ARV : I personally feel, it is not a personal आदर. अम्च॑ भाषाच.....मझ॑ effortला आदर देले म्हणून ते. मानसा धोत्रेकर, त्यांस॑ बलावून तेनी आदर केले. So अस॑ वेगळ॑-वेगळ॑ अम्च॑ भाषाला उद्धार कराला प्रयत्न कोण कोण करतात की, असलत्यांस बलावून आदर केल॑तर॑, it will go a long way in propagating. मी त्यंच Souvenirला एक दोन articles लिव्हून पाठिवलों. This the only way. It will take time and more importantly on-line communication will play a very very important role. कां म्हणजे, अम्च॑ on-line कम्यूणिटींतल॑ लोक॑, they are also members of the Brick & Mortar societies. So, तेनी तिकड॑ त्यंचकड॑ बोलून काय तरीन करूया. ते definitely कराला होईल॑. So this is the way forward. घरांत बसून, I can only talk to you. As you rightly said तंजावूरांत॑ तिकड॑ internet वगैरा वगैरा कोणाच घरांत नाही की, त्यंचकड॑ कस॑ बोलणे ?

ARV : And with internet it may not be difficult. I will tell you the reason. एक rough estimateआंत॑ अम्च॑ लोक॑ about 70 to 80,000......एक लाखाच उणेच असूया वाटत॑.

जया : एवढ॑ उणे आहेत का अम्च॑ लोक॑ ?

ARV : एचढेच. Population एचढेच आहे. It is a miniscule thing actually. पण, मराठा लोकांच population जास्ती आहे अम्च॑ पक्षा.

जया : अम्च॑ भाषा अणी मराठा लोकांच भाषा मध्ये एवढ॑ वेत्यास आहे. तेनीईं सौतांतच settle होऊन गेलाहेत॑.....?

ARV : वेत्यास आहे.

जया : कस॑ तस॑ फरक आहे ? एवढ॑ कस॑ फरक आहे, त्यंच्यांतीं अमच्यांतीं ?

ARV : I think social customs play a very important role that. अम्च॑ social customs are basically religion based social customs, नाही का ? अम्ही अग्गीन माध्वा म्हणतों, स्मार्थ लोक॑ म्हणतों. अम्च॑ religious based....अम्च॑ familyच॑ प्रकारच॑, संपाकाच॑, जेवणच॑, जेवाच पदार्थाच॑ हेला अग्गीन वेत्यास आहे. त्यंच ते, it is a different type actually. So there is a difference. मी एक उदाहरण सांगतों.

तीन चार वर्षापुढे मी तंजवूरला गेलोतों. मला तिकड॑ सरस्वती महल लैब्ररीला जायाच होत॑. तिकडल॑ पुस्तक वगैरा वगैरा पाह्याला. अणी तिकड॑ मी राजा-साहेबाला meet केलों (the Prince of Tanjoreला). He is an amazing gentleman. He is an youngster. बाबा सासेब बोंसले त्यंच नाव॑ आहे. He must be about 40 / 45 years old. मी तिकड॑ गेल अस्ताना, तेनी, he had gone out. जेवाच वेळ होत॑, around 1:30 or 2:00. तिकडल॑ त्यंच दिवाणजी (म्हणजे person in charge, घरच॑ बाहेरच ऑफीसांत बसणार मनुष) मोबैल-फोणांत॑ राजा-साहेबाला बलावून सांगट्ले, अस॑ तुम्हाला पाह्याला (भेटाला) कोणकी आलाहेत॑ म्हणून॑. प्रिंन्स फोणांत मझकड॑ बोलले. विचारले, काय म्हणून. मी सांगट्लों. तेनी म्हणट्ले अत्ता मी एक, दीड घंटेंत परतून येतों, तुम्ही जेवूनटाकून या, definitely I will meet you म्हणून. नंतर॑, both me and my wife (दोघीं होतों अम्ही) जाऊन meet केलों. अणी, I was highly impressed. अम्ही तिकड॑ बसलोतों अणी कोणकी रूमाच आंत वेघून आले. He look an ordinary person not meriting a second look in the road when you walk. तसलते एक मनुष. अम्च॑ समोर बसून बोलाला आरंभ केले. Believe me, when he started talking I knew I was talking to royalty. It was amazing. He was humble, what shall I say, very down to earth. But you know you are talking to a king. It was a very fine mixture of, what shall I say, humility and I wouldn't call it "pride".

जया : एक लक्षण अस्त॑ त्यंचांत॑. राज लोक॑ म्हणजे.

ARV : त्यांस मी मझ॑ प्रोजक्टांविषीन सागट्लों. This was, I think, three / four years back. आणी तेनी मला दोघ दनास meet कराला सांगट्ले. Immediately he called his valet अणी दोन address देऊन सांगट्ले, "take Mr. Ananda Rao to these two people". त्यांत एकले घरांत होत नाही. अण्खी एकले मिळ्ले. आत्माराम राव गरूड म्हणून. He was a retired Tahshildar. मिळाच पुढे तेनाला मी फोण केलों. तेनी म्हणट्ले, "या भेटतों. मी इकड॑ असून wait करतों". अणी तेनी वाट सांगट्ले. He said he will stand outside. अम्ही टॅक्सींत॑ गेलों. "बाहेर टॅक्सी थांबवा, मी येऊन तुम्हाला भेटून घराला बलाईंगून जातों" म्हणून॑ तेनी मला त्यंच घराला बलाईंगून गेले. It was a thatched house. I was so impressed. A Tahshildar in Tamil Nad living in a thatched house. I knew he was a real honest man. अस॑ मला वाटल॑. तेनी एक मराठा. रिटैर होऊन एक दहा पंध्रा वर्ष झालसेल॑. तेनी भरून books पुस्तक लिव्हलाहेत॑. मराठांच॑ वराडाच पद्धती वगैरा वगैरा हेज विषीन. मझकड॑ तेनी मराठींत बोलाला आरंभ केले अणी मला तेनी बोलाच जास्ती काईं समजल॑ नाही. It was amazing actually. And त्यंच सून पणीं होती. सून मझ॑ बाईलीच (मझ॑ Mrs. यांच) बरोर माराठींत बोलली, अणी मला ते काईं समजल॑ नाही.

जया : म्हणजे, त्यंच "मराठा मराठी".

ARV : It is very different. I couldn't follow much at all. तम्हा आत्माराम राव गरूड, हेनी म्हणट्ले, "होय, अम्च॑ भाषा वेगळ॑ आहे, तुम्च॑ भाषा वेगळ॑ आहे. तुम्च॑ भाषाला अम्ही रायर-मराठी म्हणतों. अम्च॑ भाषाला अम्ही ’मराठी’ म्हणतों" !          
               
जया : हे लोकांस acceptance आहे का, महाराष्ट्रांत॑ ?

ARV : नाही वाटत॑. I don't think so. अम्हालाच acceptance आहे का ? Now where is the question of acceptance ? Are we looking for "acceptance" ? Personally, I am not.

जया : एक समयांत॑ मी acceptanceआ करतां पाह्त होतें. अत्ता नाही.

ARV : It is not required, according to me. That is my personal view. ये अम्च॑ भाषा आहे. एवढ॑ उरलाहे, अम्च॑ भाषा. अत्ता अम्ही हेज पक्षा अपभ्रष्ट होयनास्क॑ पाह्यींगाम॑.

जया : But, केवढ॑की youth आहेत॑, young लोक॑ आहेत॑, तेनाला नंखर लाज वाटत॑ अम्च॑ भाषा बरती सांगाकरतां. They develop something like an inferiority complex. अणी केवढ॑की लोक॑ dominant भाषा use करतात॑, हंदी, नाहीतर॑ तमिल नाहीतर॑ कान्नडा use करतात॑, त्यंच मध्ये अणी त्यंच friendsआं मध्ये बोलाला. They identify themselves as a Kannadiga or a Tamilian. उजंड उणे लोक॑ आहेत, हेन मादरी pride घ्याच॑. And मी पणीं, मला पणीं, लाज वाटत होत॑, एवढ॑ वर्ष. But, ऑण-लैन, फेस-बुक हे ग्रूपांत॑ तुम्च सार्ख लोकां बरोर मिळ्लानंतर॑ I got the confidence. Not only confidence, but history अग्गीन कळींगट्लानंतर॑, I feel so proud. अत्ता मला लाजेच वाटत नाही. मी कोठ॑ पण जाऊ तंजावूर मराठी easily बोलेन.

ARV : होय, होय, होय. हे काय कळेल का ? अम्च॑ actually भाषाच॑ words (गोष्ट) ते अम्ही लिव्हून अम्च॑ डोळेच समोर अम्ही पाह्यलते नाही.

जया : होय, ते एक ..... अम्ही "नम॑ वर्ष" अणी "नव॑ वर्ष" म्हसणूनीं म्हणतों.

ARV : अत्ता "लिवणे" म्हणाच एक गोष्ट काढींगा. ते काय, "लिवणे" का, "लिहिणे" का ? पुणे मराठी पाह्यलतर॑ तेनी "लिहिणे" म्हणतात॑. हे काय, अम्ही "लिवणे" म्हणतों, काय अम्च॑ गोष्ट corrupt झालतेका ? अम्च॑ मनांत हे dilemma and this sort of confusion आहे. हेज आवश्य नाही. "लिवणे" म्हणूनच लिवा. पह्जे तर॑ अण्खीन थोड शुद्ध पणीं करूया. अत्ता मी "व" अणी "ह" हे दोनीं mix करून "लिव्हणे" म्हणून लिव्हतों.

जया : मी पाह्यलें तुम्च ब्ळोगांत॑ "लिव्हणे" म्हणून लिव्हलसाच॑. अस॑ केवढ॑की words तुम्ही लिव्हलायेंत॑.

ARV : Deliberately मी अस॑ लिव्हलोंहें. अस॑ कराला होईल॑, म्हणून दाखिवाला. It is not difficult at all. Particularly अम्च॑ लोक॑ अग्गीन वाचलते लोके. अत्ता "शिक्षण झालते लोके" अस॑ म्हणाला आवश्य नाही. अम्ही "शिक्षण" म्हणून सांगतों नाही पण, "वाचणे-लिव्हणे झालते लोके" म्हणून सांगतों. अम्ही लिव्हाला आरंभ करताना "शिक्षण" म्हणून नंतर॑ येईल. एक दिवस येईल ते. But then much later it will come. But the first step will have to be taken. पहिलच पाऊली काढूनच सराम॑.

ARV : In DMP, "पुनरुद्धारण" म्हणून स्पष्ट होऊन सांगाला एक कारण आहे. I have included a number of words like "शिक्षण" which we do not normally speak. But such words are understood throughout the country. ते पाव्हून मला लोके सांगट्लाहेत॑ "हे अम्च॑ मराठी नहो, अम्ही बोलत॑ नाही की, तुम्ही कां तुम्च डिक्ष्णरींत॑ घाट्लाहेंत॑" म्हणून. मी म्हणट्लों, तुम्ही मझ॑ intensions वाचून पांह्त॑ मी काय सांगट्लाहें त्यांत॑. असलते words प्रयोग केल तरेच अम्च॑ भाषा अपभ्रंशांतून सुटून एक normal languageस्क॑ होईल॑. There cannot be two opinions about that. And writing in Tamil is not the option. I am very clear about that. तमिलाला there are a lot of, I cannot say, phonetic imperfections, but phonetic drawbacks, phonetic limitations म्हणून सांगूया. अत्ता "व" "ह" confusion......      

जया : Even the.....ग्रामरांतीं केवढकी वेत्यास असेल, नहो का ? तमिलालीं अम्च॑ भाषालीं ?

ARV : Grammar is ok. The point is, grammar is a derivative of the sentences that we use in talking, नाही का ? So whichever grammar comes, we take it, fine.

ARV : अत्ता चेन्नैंत जाऊन पाहंत॑. दुकानाच॑ name-boards वगैरा वगैरा इंग्ळीषांत॑ कायतरीन असलतरीन त्यांतीन तमिलाच influence असेल॑. अत्ता श्रीलंकाच LTTEच प्रभाकरन, हेंच नाव तमिलांत॑ "पिरपाकरन" म्हणूनच लोव्हाला होईल॑. तसच "बाबू" म्हणून तमिलांत लिव्हाला होईना. "पापू" म्हणून लिव्हून पापू म्हणून वाचणे, बापू म्हणून वाचणे, बाबू म्हणून वाचणे !!! तमिलाच लिपीला this sort of limitations आहे and that has come into our language also. अम्च॑ भाषांत पणीं आलाहे ते. तसलते words, अण्खीन थोड शुद्ध करून अम्च॑ भाषांत लोव्हाला प्रयत्न करा म्हणून अम्च॑ लोकांस दाखिवा करतां मी श्री राजाराम रामचन्द्रन हेंच "अहो, एक क्षण ऐकतांत का" हे लेख अग्गीन दक्षिणी मराठींत॑ लिव्हलों. That was the main purpose in re-writing these writings. It was not to tell people, "yeah, here is a guy who can write in DM. अम्च॑ भाषा लिव्हाला होईल॑. हे सांगाला मी लिव्हत आहें.

जया : So, तुम्ही स्वता एक उदाहरण म्हणूनटाकून लोकां समोर.......

ARV : Exactly. It is a work of passion. DMP is an open ended project. नव॑ नव॑ ideas, नव॑ नव॑ sub-projects हेजांत मिळेत जाईल॑. Let us see where it goes ! Meantime it gives me lot of happiness and pleasure. More than that, it keeps me in front of my computer for hours together. Maybe, six hours, eight hours. Morning two / three hours करतों, अणी संध्याकाळी 6:30ला बसल॑तर॑, रात्री साडे अक्रा, बारा पर्यंतीन होत॑. I spend a lot of time on that.

ARV : तुम्च podcast, I really have to congratulate you on your podcast. It has been wonderful. मझ॑ प्रयत्न, मझ॑ प्रोजक्ट, अम्च॑ मराठी कस॑ लिव्हणे म्हणून लोकांला दखिवाला आहे. तसच, तुंच प्रोजक्ट is an example of how we talk our language. अम्च॑ भाषा कस॑ बोलणे हे दाखिवाला आहे.

जया : अम्ही कस॑ pronounce करतों. अम्च॑ diction कस॑ आहे, अम्च॑ accent......अम्ही क्स॑ बोलतों......

ARV : कां म्हणजे, तज पणीं recorded clips कोठीन नाही अत्ता. Your podcast is of great importance.

जया : Next अत्ता येऊन॑ youTubeआंत॑ channel open कराच plan आहे मला. At the same time expressions पणीं important आहे. Pronunciation केवढ॑ important की, तेवढ॑च expressions पणीं important आहे. So, तज करतां podcast project एक level आलानंतर॑, I am planning to open a youTube channel.        

ARV : It is a very good effort. तसेच, script लिव्हून तजांतून वाचाला प्रयत्न केल तर॑, तुम्च उच्चारण polished होऊन येईल॑. As it is, it is very good, much better than what I normally hear.

जया : But at least there is a room for improvement. It can be done. कराला होईल॑.

ARV : हेजांत एक सांगतों. रवी शेलवणकर दोन वर्षापुढे बॅनग्ळूरला आलोते and he had a get-together. लोकांस बलावून एक meeting केले. तिकड॑ मला पणीं बलवलोते. मी गेलों. तिकड॑ मला बोलाला सांगट्ले अणी मी बोललों. बोलला नंतर॑ (it was the same, almost what I am talking now) एक दोन लोक॑ मला विचारले, "काय तुम्ही पुणे मराठी बोललांत का, नाही तंजावूर मराठी बोललांत का म्हणून ! रवी म्हणट्ले, "नाही, आनंद राव was talking a pure form of तंजावूर मराठी" ! हे कस॑ आल॑ ? मी त्यंचकड॑ बोलताना (by then I was fairly adept at writing our language) एक एक गोष्टीन मझ॑ डोळेच समोरच होत॑. वाचाच सर्खच होत॑ ते !

जया : तेच, मझ॑ पणीं मराठी वेगळच आहे, दक्षिण देशस्थ मराठी बोलतें की, मझ॑ पणीं वेगळच आहे.

जया : मुंबईंत॑ राहून मझ॑ मराठींत॑ मुंबई मराठीचीं influence आहे. ते पणीं मला काढामते आहे.

ARV : होय॑. अम्ही पुनरुद्धारण करताना, ते वेळी तिकडल॑ महाराष्ट्राच मराठी अम्च॑ भाषाला influence कराला देताने. But, अम्च॑ words थोडक॑ polish करून ठिवूया.

जया : होय॑, polish करून ठिवूया. मी शिकींगत आहें, अम्च॑ भाषा. The reasons for starting this podcast is to polish my own language. कां म्हणजे, मलाच कळना अम्च॑ भाषांत॑ कित्येक दपा.....

ARV : Of course you are not old, but I am old enough. मी पहिलेच सांगट्लों की रिटैर झाल॑ नंतर॑, अम्च॑ brain active ठिवाम॑ म्हणजे एक नव॑ भाषा शिकाम॑ म्हणून. अत्ता नव॑ भाषा शिकाला कोठ जाणे ? अम्च॑ भाषाच शिकूया की !

जया : Senior Citizens लोक॑ कोण कोण हे interview ऐकत आहेंत की तेनी आनंद राव वसिष्ठ यांचकडून inspirations घेऊन तुम्ही पणीं अन्च॑ भाषा शिकींगांत॑ अणी अम्च॑ भाषाला पुनरुद्धार करा करतां help करांत॑.

जया : अत्ता मझ॑ शेवटल॑ question. तुम्च काय उद्देश आहे "मझ॑ अस्तित्व" ऐकणार लोकां करतां अणी अम्च भाषा बोलणार लोकां करतां. काय उद्देश आहे त्यंच करतां ? अम्ही कस॑ अम्च॑ भाषाला दत्तन करांव॑ ?

ARV : दत्तन करणे असेच..... They have to get involved and get passionate about it. कां म्हणजे, अम्च॑ ॲण-लैन कम्यूणिटींत॑ भरून दन॑ सांगट्लाहेत॑ अम्च॑ culture maintain कराम॑ म्हणून, नाही का ?

जया : होय॑. But religion व॑र जास्ती focus आहे. भाषाव॑र focus नाही.

ARV : ते...एक एक phase आहे. म्हणजे, अत्ता religion असेल॑, तज नंतर॑ संपाक्च व॑र असेल॑, अण्खीन थोडक नंतर॑ लेकर॑. It will go on changing. मी सांगाच॑, अम्च॑ culture maintain कराम॑ म्हणजे we need to get our language in order. Language is the back bone of culture. Otherwise we will be standing on quicksand or shifting sand and trying to protect our culture.

जया : तेच अम्च॑ भाषांत सांगांत॑, मराठींत॑ !

ARV : ते फार कष्टच मी सांगतों ! अम्च॑ भाषाला, अम्च॑ संप्रदायाला पुढे बरोबर बंदोबस्त करून ते दत्तन कराम॑ म्हणून असल॑ तर॑, अम्च॑ भाषाला अम्ही उद्धार करल॑ तरेच होईल॑. कां म्हणजे, भाषा बरोर असल॑ तरेच, अम्च॑ संस्कार तज बरोर जोडून बरोर ठिवाला होईल॑. हेच मझ॑ मुख्य message. So, that is the main thing. हे झाल॑ तर॑ अम्च॑ next पीढीच लोकांस॑, पुढे याच पीढीच लेंकर॑-बाळांस॑, अम्च॑ भाषाच व॑र अण्खीन थोड गौरव, अभिमान वाढूया. ह्यांत॑ मला संदेहच नाही. ते कराच अम्च॑ जवाबदारी आहे.

जया : Thank you. एवढ॑ वेळ बोला करतां मझ॑ बरोर. उजंड thanks, एवढ॑ नीट explain करा करतां लोकांना. And I truly hope तुम्च॑ हे podcast ऐकूनटाकून लोक॑ पुढे येतील contribute करा करतां. Already आहेत॑, साई श्रीधर जनार्धन and team. But, अण्खीन जास्ती pro-active दाखीवून होम॑ लोक॑. So, अण्खीन करल॑तरेच पुढे येऊन हेन मादरी practical होऊन.....थोडक॑ time invest करल॑ तरेच अम्च॑ भाषा अम्ही preserve कराला होईल॑. तेच मझ॑ पहिलेसून motto होत॑, अणी हे motto पुढेईं continue होईल. Yeah, we have to form a team, atleast on-line team तरीन करूओं.

जया : अम्च॑ जातींत॑ people marry from outside caste. Inter-caste नाही, अत्ता inter-racial होऊन गेलाहे. त्या नंतर॑ तसेच अम्च॑ भाषा ते generationआशी मरून जात॑. Looks awkward. And another thing is, केवढ॑ की लोक॑ अत्ता UK / USAन्त॑ settle होऊन गेलाहेत॑. So, त्यंच लेंकर॑ अग्गीन नुस्त इंग्ळीषच बोलतात॑. दुसर॑ वेगळ॑ कोण्त Indian भाषा पणीं बोलत नाहीते. So again, ते language मरून जात॑. ते revive करा करतां we have to take some drastic measures. So, हे मादरी काईं करून....कवी सम्मेलन....भाषा सम्मेलन.....हे ते करून we have to do something, we have to take some proactive stand, proactive initiative घेम॑. नुस्त ॲण-लैनांत बसून फेस-बुकांत॑ ग्रूपांत॑ discuss करून काईं होणार नाही. So we have to do something.

ARV : होय॑. So, that's about that. अण्खीन बोलाच भरून आहे. I think we will take some other occasion to talk about all that.

जया : It was really nice talking to you and I look forward to talking to you again. केम्हा तरीन new topic....and तुम्चकडे टोपिकाल तरीन उणे नाही ! We can definitely carry forward.

ARV : Ok Jaya. Thanks for the interview.







No comments:

Post a Comment