दक्षिणी मराठी एक भाषाका, नाही अपभ्रंशका ?(Comparative versions in TM & SM)
Sometime back I had reproduced an article of mine (which was first published in SIMA's 33rd Formation Day Souvenir) in www.mdmsin.com. A Follower of my blog had subsequently sent me a Standard Marathi version of my article. Given below is a sentence-by-sentence comparison of the two versions.
दक्षिणी मराठी एक भाषाका, नाही अपभ्रंशका ?
हेला उत्तर द्याच॑ पुढ॑ एक सांगतों. मी ल्हान असताना, मह्णजे ल्हान साळेंत वाचताना, अमच॑ कुटुंब॑ अनंतशयनमांतून (त्रिवेन्द्रमांतून) चेन्नैला स्थिर॑ होऊन राह्याला
गेलों.
मला तमिल थोड॑-थोड॑
येत होत॑ तरीन॑ अमच॑ नव॑ कामवाली पोन्नम्माच॑ तमिल मला अर्थ कराला झाल॑ नाही.
पण, तिज॑ लेंकीच॑ तमिल मला
सुलभांत॑ अर्थ होत होत॑.
डोस्के फोडाच॑ प्रश्न काहीं नहो हे. मायाला लिव्हालीं वाचालीं येत होत॑ नाही, पण लेंक साळेला जात होती. भाषाचीं अपभ्रंशाचीं मध्ये व्यत्यास एवढ॑च, लिव्ह्णे अणी वाचणे.
तंजावूर मराठी पोन्नम्माच॑ तमिलाच॑ गेताला कस॑ येऊन पावल॑? खर॑ सांगटल॑ तर॑, अम्ही अग्गि दनीं हेला जवाबदारी आहों; गेलते एक-एक
पिढीहीं.
पोन्नम्मास्क॑च, अम्हालपणीं अमच॑ भाषा वाचालीं लिव्हालीं कळना. मझ॑ पिढींतल॑ लोकांस॑, ते वेळी तमिलनाडांत॑ होत होत॑ ते हिंदी-विरुद्ध संभ्रमामुळे देवनागरी लिपी शिकाला
झाल॑ नाही.
पण, अमच॑ लेंकरे नातोंडे यांस॑
असल॑ ते अडचण काहीं आहे का ?
तंजावूर मराठी शिकल॑ तर॑च काम मिळेल अस॑ काहीं नाही
म्हणून॑ अम्हाला कळल॑ तरीन॑, अमच॑ भाषेला अवमान॑ कराला
सोडून द्याला होईल का ?
भारतांत॑च एक चोक्कोट॑ स्थितींत॑ असाच॑ अम्ही हे होयाला
सोडताने. अमच॑ संस्कारावरीं
पार्यंपरावरीं फार॑ गौरवीं अभिमानीं असणार॑ अम्ही हे होयाला सोडताने.फार॑च वेगळ॑ जातांतल॑ भाषाच॑ वातावरणांत॑
असूनपणीं साडेतीनशे वर्षावर॑ अमच॑ भाषा वांचून॑ आलाहे म्हणून॑ कळींगून॑ अम्ही हे
होयाला सोडताने.
अमच॑ भाषा एक अपभ्रंश॑ आहे अस॑ अमच॑मध्ये कोणाल-कोणाला वाटते की, त्यांस अग्गीन ते एक अपभ्रंशास्कच वाटेल॑. तस॑च, तंजावूर मराठीला एक भाषाच॑ लक्षण॑ आहे अस॑ वाटणारांस॑ ते
भाषास्क॑च दिसेल॑. पण, नुस्त॑ वाटल॑ तर पुर॑ना. अम्हाला अग्गि दनालीं तंजावूर मराठी
लिव्हालीं वाचालीं कळून॑च सराम॑. पोन्नम्माच॑ लेंक दाखिवलि त्यास्क॑ तंजावूर मराठी सुधारम॑
म्हणजे अम्ही ते भाषा शिकल॑ तरच होईल॑.
|
दक्षिणी मराठी - भाषा की अपभ्रंश
?
ह्याचं उत्तर देण्यापूर्वी एक सांगतों. मी लहान असताना,
म्हणजे शाळेंत शिकत असताना, आमचं कुटुंबत्रिवेन्द्रम् मधून
चेन्नईला स्थिर होऊन राहायला गेलं.
मला तमिऴ थोडं-थोडं येत होतं, तरीही आमची नवी कामवाली पोन्नम्मा, तिचं तमिऴ मला समजत नसे.
पण, तिच्या लेंकीचे तमिऴ मात्र मला सुलभरीत्या समजत असे.
हा काही डोके फोडण्याचा प्रश्न नाही. आईला लिहायला-वाचायला येत नव्हतं, पण लेक शाळेला जात होती. भाषेच्या अपभ्रंशामध्ये व्यत्यास
एवढाचअसतो - लिहिणे आणि वाचणे.
आता तंजावूर मराठी पोन्नम्माच्या तमिऴ पर्यंत कशी येऊन
पावली? खरं सांगितलं तर, आम्ही अख्खेजण ह्याला जवाबदार
आहोत; गेलेली एक-एक पिढीहीं.
पोन्नम्मा सारखंच, आम्हालापण आमची भाषा वाचायला-लिहायलाही कळेना. माझ्या पिढीतल्या लोकांस, त्या वेळी
तमिऴनाडूत होत असलेल्या हिंदी-विरोधाच्या संभ्रमामुळे देवनागरी लिपी
शिकायला झालं नाही.
पण आमची लेकरें नातवंडे यांस असली ती
अडचण काहीं
आहे कां ?
आम्हाला कळतंय, की तंजावूर मराठी शिकली तरंच काम मिळेलअसं काहीं नाही. पण म्हणून, आमच्या भाषेचा अवमान करायला ती आम्ही अशी सोडून देवू कां
?
भारतातील एक उत्तम प्रगतीपथावरीलस्थितींत असणारा आमचा
समाज, असे असताना आम्ही हे होवू देता कामा नये. आमचे
संस्कार आणिपरंपरा ह्यांचा फार गौरवाभिमान असणाऱ्या आम्ही हेहोवू देता कामा नये. फारच वेगळ्याजातकुळीतल्या भाषेच्या
वातावरणांत असूनपण साडेतीनशे वर्षावर आमची आज भाषा
टिकून आहे हेलक्षात घेवून आम्ही हे होवू देता कामा नये.
आमची भाषा ही अपभ्रंशात्मक आहे असं आमच्यामध्ये ज्यांस
वाटते, त्यांस अख्ख्यांस ती एकअपभ्रंशासारखीच वाटेल. तसंच,
तंजावूर मराठीला एक भाषेचं लक्षण आहे असं वाटणाऱ्यांस
तीभाषेसारखीच दिसेल. पण, नुसतं वाटलं तर पुरेना. आम्हाला
अख्ख्या जणांना तंजावूर मराठी लिहायला-वाचायलाही कळायलाच हवी. पोन्नम्माची लेक दाखवली
तिच्यासारखी, तंजावूर मराठी सुधारायची म्हणजेतर आम्ही ती
भाषा शिकली तरच होईल.
|
अम्च मरात्ति भेश होत सार. Very nice work sir.
ReplyDelete