Friday, 5 May 2017

बाली विनोदयात्रा




Holiday in Bali

Recently I made a holiday trip to Bali, Indonesia with my family. My primary interest was to observe Hinduism as practiced in Bali. Fortunately the days of our visit coincided with the most important religious festival in Bali, “Galungan” celebrating the victory of dharma over adharma which lasts for 10 days. Given below is my narration about this trip.

बाली विनोदयात्रा

दुपारच झोंप आल नाही म्हणून तद्दी इंटरनेटांत॑ उगे सर्फ करत होतों. स्क्रीनांत "Best of Bali" म्हणून आल॑. Trip Adviser काय सांगते म्हणून वाचून पाह्यलों. तेवढच, अम्च॑ "सहा रात्री, पांच दिवस" बाली कार्यकम आरंभ झाल॑ ! मी, मझ॑ पत्नी, लेंक अणी नातू अम्ही चारदनीं बाली-इंटरनाशनल-एर्पोर्टांत एप्रिल पांचला जाऊन उतरलों, कोलालंपूर वाटी. "डेनपसार" इकडे आहे बालीच एर्पोर्ट. कचा-कच गुंप. भूलोकांतल॑ सगळ॑ देशांत्सून लोके आल्होतेस्क॑ होत॑ ! भारतांतून लोके थोडक उणेच होते. पोणावांटादनीं अमेरिका, यूरोप, जपान असलते देशांतून होते. एशियाच विध-विध देशांत्सूनपणीं होते. भीड भरून होत॑तरीन, बाह्येर लोक्कुरच आलों. उतरतांतरून, एर्पोर्टाच आंतच, "श्रीकृष्णा अणी पूतना राक्षसी" ह्यंच थोर बावोली डोळेला पडले. फार मोठ्ठ॑ आकाराच होत॑. टॅक्सींत बसून बाह्येर आलोंकी-नाही, एक मोठ॑ Traffic-island-आंत॑ हेजपक्षा थोर विग्रह पाह्यलों. पंढ्र रंगाच सहा घोडाच रथ पाव्हून श्रीकृष्ण-अर्जुनाच म्हणींगट्लों. पण, कर्ण अणी घटोतगजाच मध्ये झालते महायुद्धाच विग्रह होत॑ ते. पाह्याला फार सुंदर होत॑. बालीच हिंदू धर्माच परिचय अम्हाला पह्यिल॑-पह्यिल॑ मिळ्ळते असच॑.


"श्रीकृष्णा अणी पूतना राक्षसी"  


कर्ण अणी घटोतगजा
भूलोकांतल॑ प्रसिद्ध टूरिस्ट-सेंन्टरांत बाली पणीन एक. इन्दोनेश्याच सुमार सत्राहदार द्वीपसमूहांत॑ बाली एक ल्हान द्वीप. भूचित्रांत॑ बाली कोठ॑ आहे म्हणून हुडकलतरच डोळेला सांपडल॑. तेवढे ल्हान द्वीप ते. जनसंख्या पंचेचाळीस लाख. हेजांत॑ चाळीस लाख लोके हिंदू धर्माच आहेत॑. इन्दोनेश्याच पंचवीस कोटी मुस्लीम जनसंख्याच बरोर पाह्ताना हे काहीनच नाही. तस असूनपणीन, तिकडले लोके हिंदू धर्म एक सामूहिक रूपांत॑ कस॑ आचरण करतात म्हणून स्वता पाह्यलतरच अम्हाला विसंबाला होईल॑डेनपसार, कूटा असलते आधुनिक पट्णांत॑की नाही, ग्रामप्रदेशांतकी हिंदू धर्माच आचरण त्यंच जीवनाच अविभाजित भागास्क॑ करून ठींगट्लाहेत॑. भारताच बायका कुंकू लावास्क॑, तिकडले ल्हान-ल्हान पोरी, युवती अणी वय झालते बायका हेनी सगळीन कपाळांतीन गळांतीन चंदन लावलसाच पाव्हूया. विचारतान कळ्ळ॑, ते चंदन नहो, पण भिजिवलते तांदूळाच पीठ म्हणून. दिवसोडी घरांत पूजा करून तेनी हे लावींगतात॑. देऊळाला जाऊन तिकड विशेष पूजा केलतर॑, हातांत दोराच कांकण बांधतात॑. दादिगेपणीन दोराच कांकण बांधींगूनअसाच पाव्हूया. सणाच दिवसी बायकालोके अग्गीन नेसलते वस्त्राच व॑र, पिवळे अणी गेरू (अथवा कावि) रंगाच कापड बांधींगून असाच पाव्हूया. दादिगालोके पंढ्र रंगाच कुर्ता/सरोंग (त्यंच वेष्टी) नेसींगून डोस्केंत एक विधाच मुंडास बांधींगून अस्तील॑. अम्ही तिकड जाऊन पावलते दिवसी तिकडले सगळ्यांपक्षा थोर सण आरंभ झाल्होत॑. चार दिवस ते सण चालू होत॑. कोठ पाह्यलतीर सणाच संभ्रम. गांवापटीस लोकांच मिरवणूक फार उत्साहांत होत असाच पाह्यलों. अम्च॑ इकडे तुळसीच ब्रिंदावन असास्क॑, तिकडपणीन दर-एक घराच समोरीन पूजाच अलंकार दिसत होते. चुकनास्क॑ प्रति दिवसीन तला नव॑ अलंकार करून ठिवणे आहे. त्यंच भक्तीच श्द्धा पाव्हून आश्चर्य वाटले.


देव-दर्शन कराला याच भक्तजन॑ 

बीदीच दोन पटीसीन लोकांच मिरवणूक. देऊळाला जायाच लोके अणी जाऊन पूजा करलांपिरी वापस याच लोके. बायकांच हातांत॑ बेताच ताटांत॑ पूजाच सामग्री जोडून ठिवलसाच पाह्यलों. फूल, पंडू, नारळाच मट्टांत केलते अलंकार साधन॑, पाणीच एक ल्हान वाटी, दूधाच वाटी, हे अग्गीन होते. पण अम्हाला आश्चर्य वाटलते काय म्हणजे, तज बरोर पेटिवलते सिगरेट (होय, cigarette) पणीन होते ! काय म्हणून विचारताना कळ्ळ॑, हेच तिकडल॑ धूपारती म्हणून ! म्हणजे, मिरवणीला जाताना हे पणीन ठिवणे आहे. योचना करलों. अम्चकडे सुपारीला पूजाच सामग्रीच बरोर अम्ही वापरतों. सुपारी पणीन एक नशाचकी, तंबाकूलाहीं सुपारीलाहीं हे विषयांत काय व्यत्यास॑

वाट पूरा देऊळ. बालींत उणेपक्षा दहाहदार हिंदू देऊळ आहे म्हणतात॑. ब्रह्मा, विष्णू, महादेव (रुद्रा म्हणतात), हे तेनीं मीळ्ळते त्रिमूर्तीला पूजा करतात इकडल॑ लोक॑. पण, एक मुख्य व्यत्यास काय म्हणजे, हे त्रिमूर्तीला विग्रह नाही. परमात्माला आकार नाही म्हणून ह्यंच संकल्प॑. श्रीरामा, सीता (शिंटा म्हणतात सीताला) श्रीकृष्ण, गणेश, सरस्वती असलते देवांच विद्रह गाम पूरा पाव्हूया तरीन, ते विग्रहालाअग्गीन त्रिमूर्तीला करास्क॑ पूजा करत नाहीते. बालीच हिंदू धर्मांत विग्रहाच पूजा नाही. त्रिमूर्तीला आवाहन करून बसिवाला धोंडांत केलते आसन असते. सुमार 4'x4' विस्तार अणी सुमार 8' उंच असाच धोंडाच बांधणीच व॑र असते हे आसन. पूरा बांधणींतीन कोरून काढलते शिल्प-कलाच अलंकार असते. ज्वालामुखी पर्वताच (volcano) लावाच धोंडांतून करतात हे बांधणी.

प्रजापतीच देऊळांत देवाला आवाहन कराच आसन॑ (गर्भ-गृह). विग्रह-पूजा नाही इकडल॑ हिंदू धर्मांत॑

बालीच हिंदू संप्रदायांत दोन विधाच पंचांग वापरतात॑. 210 दिवसाच एक पंचांग अणी अम्ही वापराच शक-संवत्सराच पंचांग. महिनेंच नाव अग्गीन अम्चस्क॑ असत नाही. युगादीच दिवसाला हेनी "Nyepi" दिवस म्हणतात. हे वर्षी अम्च॑ युगादी (गुढीपाडवा) अणी त्यंच Nyepi एकच दिवसी झाले. Nyepi दिवसी पूरा देश मौन-वृत आचरण करतात. मात्र नहो, ते दिवसी कोणीनच एक प्रवृती पणीन करत नाहीते. घरांत चूल पेटिवणे पणीन नाही. हे नियम उदंड निष्ठांत अग्गिदनीन आचरण करतात॑. विदेशांतून आलते अग्गिदनीन त्यंच होटलांतच असून सराम॑, बाह्येर उतराच नाही. तद्दी पूरा देश निशब्दांत असते

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असलते वर्ण तिकडपणीं आहे, पण वर्णभेद अम्च॑ देशांत असास्क॑ रूक्षरूपांत नाही. सहा दिवसीन अम्च॑ बरोरच होतते टॅक्सी-ड्रैवर शूद्र होते. अम्ही राह्यल्होतते होटलाच मॅनेजर एक ब्राह्मण होते. त्यंच बरोर मी हेज विषीन भरून बोलून कळींगलों. दोघदनीन गायत्रीमंत्र संस्कृतांत बेष सांगून दाखिवले मला. अग्गि साळेंतीन गायत्रीमंत्र तीन वेळीन सांगाच पद्धती आहे बालींत॑. मात्र नहो, कित्येक टी,वी. अणी रेडियो चानलांतीन गायत्रीमंत्र तीन वेळीन सांगतील॑. पुरोहितलोकांस॑ संस्कृत मंत्र अणी श्लोक त्यंच पूजा पद्धतीच आवश्याजोक्त॑ कळून अस्त॑. पुरोहितलोके मात्र जानव घालींगतात॑. दुसरे ब्राह्मणलोके जानव घालींगणे नाही. बालीच हिंदूधर्मांत॑ अम्चस्क॑ मूर्ती-पूजा नाहीतेकरतां देवाला अभिषेक करणे, मंगळारती दाखिवणे असलते शोदशोपचार पूजाविध॑ नाही. संस्कृत मंत्राच बरोर तिकडले भाषांतीन, कित्येकदपा चीन-भाषांतीन देवाला प्रार्थना करणे आहे. त्रिमूर्तीला विना, पित्रु-पूजा अणी प्रकृतीश्क्ती-पूजा असपणीं करणे आहे. हिंदूधर्माच आचरण करणेंत॑ त्यांस थोडकपणीं संकोच नाही. कस॑ मुसलमान लोके नमाज़ असाच ठिकाणीच करतातकी, तसच बालीच हिंदू लोकेपणीं बाह्येर उघडे ठिकाणी तस-तसच ल्हान-ल्हान प्रार्थना कराच अम्ही पाह्यलों. एक ल्हान बीदीवाटे अम्च टॅक्सी जात अस्ताना बाजूच षोप्पिंग-मॉलांत्सून सुंदर आधुनिक वस्त्र नेसींगलसाच एक युव-पोरी पूजा सामग्री अग्गीन एक बेताच ताटांत ठींगून बाह्येर आली. तिकडेच बीदींत दोन निमिष पूजा करूनटाकून पर्तून आंत वेघून गेली. तिज पूजा संपजोरी बीदींतल॑ ट्राफ़्फ़िक राखून होते. अस॑ होणे सर्व-साधारण म्हणून अम्च॑ ड्रैवर सांगिट्ले. कोणालीन हेजमळे काहीं आरोप नाही, आक्षेप नाही. मुसलमानलोके त्यंच धर्म उघड॑-उघड॑ करतातकी, तसच हिंदूलोके पणीन करतात, एवढेच. नव॑ पिढीच युवजन अस॑ करतातकी, फार संतोष म्हणींगट्लों मी. हंदूधर्माच पालन सामूहिक उत्सवास्क॑ उघड॑-उघड॑ करतात बालींत॑.

दहा दिवसाच "गालुंगन" हिंदू उत्सवाच वेळी अम्ही बालींत होतो. दहा दिवसीन पूरा देश उत्सवाच संभ्रमांत अस्त॑. वर्षाला एकदपा होयाच हे उत्सवाच वेळी अम्ही तिकड होतों म्हणाच अम्च॑ भाग्य म्हणूनच सांगाम॑. अनेक देऊळ दर्शन करलों. त्यांत्सून मला प्रत्येक होऊन दोन फार अवडले. इंदिराच देऊळ "तीर्थ एमपुळ" अणी रुद्राच देऊळ "तनाह-लोट". इंदिराच देऊळांत असाच तीर्थांत स्नान करलतर॑ शुद्धीकरण होईल म्हणून तिकडेल॑ लोके विश्वास करतात॑. इकडल॑ तीर्थ इंदिराच श्रमामळे झाल॑ म्हणतात. इंद्रदेव वज्रायुध प्रयोग करून पर्वताला फोडून पाणी सुटिवलते संभव ऋग-वेदांत आहे. "तीर्थ एमपुळ" देऊळाच मुख्य पुरोहिताकडे अम्ही बोलताना मला हे विषय सयेंत आल॑. टूरिस्ट लोके भरून होते तिकडे. विशेष पूजा कराला म्हणून आलते ग्रामलोकांच भीडाविषीन सांगणेच नोको ! तद्दी अम्ही तिकड अनुभव करलते संभ्रम विसराला होईनाच होईना

"तीर्थ एमपुळदेऊळांत तीर्थ स्नान


तीर्थ-एमपुळ देऊळांत पूजाला आलते ग्रामलोकां बरोर मझ॑ पत्नी अणी लेंक. 

समुद्राच कांठशी असाच रुद्रदेवाच "तनाह-लोट" देऊळ अम्च॑ होटलांत्सून सुमार एक घंटे प्रयाणाच दूरांत होते. पाष्टे लोक्कुर अम्ही तिकड जाऊन पावलों. बालीच अति-सुंदर देवस्थानांत हे अग्र म्हणून सांगतात॑. प्रशांत वातावरण. समुद्राच लाटाच शब्द विना निशब्द ठिकाण. प्रकृति-सौदर्याच अनुग्रहांत देऊळीन तज परिसरीन झळकत होते. देऊळाच भोंताले परिसर पूरा झाड-झुडूपाच सुंदर उद्यान. अग्नि-पर्वताच निवलते लावाच धोंडा अणी वाळूच भोंईं. समुद्रांत नंखर दूर होत॑ ते देऊळ, म्हणजे एक ल्हान सेतूच व॑रून चालून जायाच एवढ॑ दूर. पण, अम्ही तिकड जायाच वेळी समुद्राच "है-टैड" होत॑-ते-करतां सेतू पाणींत बुडून होत॑ अणी अम्हाला देऊळाच आंत जायाला झाल नाही. प्रकृति-सौदर्याच आस्वाद घेत अम्ही तिकड एक घंटे पर्यंतीन राह्यलों.

"तनाह-लोट" अणी "तीर्थ-एमपुळ" हे दोन देऊळाच बाह्येरीन असाच दुकान-बीदींत व्यापार कराला तमाषा होते ! बालीयात्राच सयेला म्हणून "सोवनीर" घेम॑ म्हणजे भरून दिनसाच सामग्री मिळल इकडे. बेरम कराला उत्तम ठिकाण ! कित्येक दुकानांत "इकड बेरम करूया" म्हणून बोर्ड पणीं लोंबिवून घाट्ल्होते. जेबांत भरून पैसा असलतर॑ वेळ जायाच कळनाच कळना. बेरम कराला संकोच म्हणजे उबूदांत जाऊन काय पह्जतरीन घेऊया. "उबूद" म्हणजे एक गामाच नाव. टूरिस्ट लोकां कडून पैसे उपडाला म्हणून हे गांव आहे-की काय-की. हात ठिवाला होईना, तेवढ॑ मोल एक एक साधनालींपण, गाम मात्र फार सुंदर होते. अम्च॑ टॅक्सी ड्रैवर षाणा होता. उबूदांत पणीं अम्हाला तो एक बेरम कराच ठिकाणी बलाईंगून गेला. काय-कायकी घेट्लों तिकडून. बेतांत करलते कर-कौशलाच चोक्कोट-चोक्कोट बुट्टी, वाटी, ताट असलते फार बेष होत॑. देवाच साळिग्रामाच संपुष्ट ठिवाला म्हणून मी भरून दिवांत्सून बेताच बुट्टी हुडकत होतते, उबूदाच हे बेरम दुकानांत सार्थक झाल॑. बंग्ळूराला वापस आलांपिरी तज व॑र कृष्णांजन गुंडाळून शिवलतर॑ काम पूरा होईल म्हणींगून बरोरल॑ लांब-रुंदाच एक बुट्टी घेट्लों.

उबूदांत दुपारच॑ जेवणे. होटल चालिवाच कुटुंबाच घरच॑ अंगणांत॑ आहे हे होटल

सुप्रसिद्ध बाली-नृत्य पाह्याला दोनदपा अम्हाला अवसर मिळ्ळ॑, पह्यिलच दिवस अणी शेवटीच दिवस. "उलुवातु" देऊळाच नृत्यांगणांत रामायणांतून कित्येक भाग नृत्य-नाटकाच रूपांत पाह्यलो. संध्याकाळी सूर्यास्तमनाच वेळी समुद्राच कांठशी असाच ते रंगभूमींत टूरिस्ट लोके कचा-कच भरून बसल्होते. अम्ही तिकडे जाऊन पावताना थोडक उशीर होऊनगेलेतरीन, देवाच दया, बसाला चोक्कोट ठिकाण मिळ्ळ॑. बसलते ठामांतून समुद्राच लाटा अम्हास दिसत होतेतज मागे समुद्रांत ढकळून असाच डोंगूराच कडा. अस्तमन सूर्याच किरण लाटाच व॑र झळकत होते. अति मनोहर दृश्य. सीता अपहरण, जटायू वध, अशोक-वनांत सीता हनुमानाच मिळणे, लंका दहन हे भाग अग्गीन नृत्य-नाटकाच रूपांत॑ बालीच "केचक" नृत्याच कलाकार प्रदर्शन करून दाखिवले. मारीचाच प्रवेश अणी वध, रावणासुराच प्रवेश, हनुमानाच प्रवेश हे अग्गीन फार बेष होत॑. शेवटी रंग-वेदींत॑ वृत्ताकारांत घास (वाळलते गवत) पसरून, तला विस्तु पेटीवून इकडे-तिकडे आकाशांत उडिवून लंका दहनाच दृश्य दाखिवताना निज होऊन जळाच लंकापुरींत असास्क॑ वाटल॑ अम्हाला.

उलुवातूच नंतर॑, शेवट्ल॑ दिवसी अम्ही "गरुडा-विष्णू केंचना" उद्यानाला गेलों. दोन ल्हान डोंगूर अणी तज मध्यल॑ तळ-भूमीच परिसरांत आहे हे. हे बाग नव॑ होऊन, अत्ता-अत्ता, विनोदयात्राला उद्धार द्याकरतां बांधलते म्हणून सांगतात॑. प्रकल्पाच काम अण्कीन संपल नाही. सुंदर उद्यानाच मध्ये दहा गज उंच (म्हण्जे, सुमार तीस फ़ुट उंच) विष्णूच प्रतिमा पाह्यलों. नाभीच (बोंबीच) वरच॑ भाग, म्हणजे, छाती, भुज अणी मुख मात्र आहे हे प्रतिमाला. तळ-भूमीच बाजू डोंगूराच कडांतून कोरून काढलते गरुडाच मूर्तीहीं उदंड थोर होत॑.

"गरुडा-विष्णू केंचना" उद्यानांत विष्णूच विग्रहाच समोरल॑ नृत्यांगणांत॑ बाली-नृत्य पुन्हाहीं पाह्यलों. हेजांत पणीं रामा अणी सीता हेनीच मुख्य पात्र. पण, खाणीच विषय अम्च॑ रामायणांत होतत्यास्क॑ मला वाटल॑ नाही. बालीच रामायणांतल॑ कित्येक उप-कथा अम्च॑ रामायणांत नाही. तद्दीच नृत्य-नाटकाच कथा मला पूरा समजल॑ नाही. तरीन, नृत्य उदंड सुंदर होत॑. उत्तम रीतीच अभिनय-रस अणी शृंगार-रस, हे दोनीं ते नृत्य-नाटकांत पाह्यलों. कलाकारांच वस्त्राभरण पणीं फार बेष होते. ते नृत्य-नाटक पाव्हून एक सात्विक अनुभव मिळ्ळतेस्क॑ झाल॑ अम्हाला.

"गरुडा-विष्णू केंचना" उद्यानांत बाली नृत्य. रामायणांतून एक उप-कथा.

हिंदू धर्म बालींत कस॑ आल॑ केम्हा आल॑, हेला स्पष्ट आधारकी सिद्धांतकी नाही. पण, धर्म आचरण कराच रीती पाव्हून एक दोन ऊह अम्हाला करूया. चरित्रादि काळापसून हिंदू धर्म इकडे प्रचारांत आहे. बालीच धर्म-चरित्रांत॑ ऋशी-मुनींच आरण्यांतल॑ आश्रमाच विषीन, मार्कंडेय ऋषीं पसून, भरून विवरण आहे. इकडल॑ धर्मांत विग्रह-पूजा नाही. ऋग-वेदाच काळांत॑ भरतवर्षांत॑ विग्रह-पूजा होतनाही म्हणतात॑. म्हणजे, ऋग-वेदाच काळांतच हिंदू-धर्म बालीला आलसूया म्हणट्लतर॑ चूक होईना. विग्रह-पूजा करतात नाहीतरीन, श्रीरामा, श्रीकृष्णा, गणेश, शिव-पार्वती, सरस्वती ह्यंच अग्गीन विग्रह गाम पूरा आहे. अक्रावां शतकांत राजेंद्र चोळाच आक्रमणाचीन, तसच, तमिलनाडांतून आलते व्यापारींच संपर्कामळेहीं इकडल॑ हिंदू संप्रदायांत झालते एक परिणाम असूया हे विग्रह अग्गीन. पण, हे विग्रहाला अग्गीन नुस्त उप-देवतांच प्राधान्य मात्रच॑ देतात इकडल॑ लोके. मलेस्याच तमिल-हिंदू संस्कारांत असाच "तै-पूसम" सण, "कावडी-आट्टम" अणी मुरुगनाच विग्रह-पूजा असलते अग्गीन बालींत नाही. आकार नाहीते त्रिमूर्तीला संस्कृत मंत्र सांगून पूजा करतात॑ इकडल॑ लोके. मूल स्वभावांत॑ बालीच हिंदू संप्रदायाला ऋग-वेदांत विवरण करलसाच धर्माच सरळ लक्षण आहे, अस॑ वाटते मला.

हे यात्राविवरण लिव्हाला आरंभ करताना सांगिट्लों, दुपारच॑ अडनीदांत इंटरनेट सर्फ़ करत अस्ताना बालीच यात्राविषीन योचना आल॑ म्हणून. ते अर्ध-झोंपांत स्वप्न आल॑की नाहीकी, खर॑ होऊन स्वप्नलोकाला जाऊन आलतेस्क॑ होत॑ हे विनोदयात्रा. आज पर्यंतीन ते स्वप्नांतून उठलों नाही मी.


No comments:

Post a Comment